अयोध्या पोळ यांनी केलेल्या पोस्टची दिवसभर चर्चा

पोळ यांनी या पोस्ट मध्ये मशाल चिन्हावर लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार

    कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे सुषमा अंधारे वरून सरदेसाई यांच्या पाठोपाठ केदार दिघे आज सकाळी अयोध्या पोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांनी ट्विट करत एक पोस्ट शेअर केली. पोळ यांनी या पोस्ट मध्ये मशाल चिन्हावर लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असून मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाविरोधात संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

    याबाबत सकाळी अयोध्या पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना फोन बंद होता. सायंकाळी अयोध्या पोळ यांच्याशी संपर्क साधला असता ठाकरेंनी खूप कार्यकर्ते मोठे केलेत, शिवसेनेत काहीही होऊ शकते. मात्र मी लहान कार्यकर्ता आहे ही पोस्ट एप्रिल फुल होती असे सांगितले.

    काय आहे ट्विट?