सरकार काेसळण्याचे भाकीत हास्यास्पद, बहुमताचा आकडा 164 वरून 184 जाईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, म्हणाले…

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही दाेन वेळा एकूण 288 आमदार असलेल्या विधानसभेत 164 चा आकडा पार केला हाेता. एकदा विश्वास प्रस्तावावेळी तर काॅंग्रेसचे 10 आमदार गैरहजर हाेते. त्यानंतर यानंतर पुन्हा विश्वास मताची वेळ असल्यास शिंदे - फडणवीस सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या 184 पर्यंत पाेहाेचेल. बीडमधील व्हिडिओवरूनही भाजप प्रदेशाध्यक्षांनी विराेधकांना सुनावले.

    मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार 14 फेब्रुवारीपर्यंत काेसळेल, असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केलेले भाकित हास्यास्पद असल्याचा टाेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावाला. ते रविवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अकाेल्यात आले असता माध्यमांशी बाेलत हाेते. शिंदे – फडणवीस सरकार बहुमताचा आकडा 164 वरून 184 असे पार करेल, असाही दावा त्यांनी केला.

    चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही दाेन वेळा एकूण 288 आमदार असलेल्या विधानसभेत 164 चा आकडा पार केला हाेता. एकदा विश्वास प्रस्तावावेळी तर काॅंग्रेसचे 10 आमदार गैरहजर हाेते. त्यानंतर यानंतर पुन्हा विश्वास मताची वेळ असल्यास शिंदे – फडणवीस सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या 184 पर्यंत पाेहाेचेल. बीडमधील व्हिडिओवरूनही भाजप प्रदेशाध्यक्षांनी विराेधकांना सुनावले. पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून, त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्यांच्याविराेधात विराेधकांची टिम षडयंत्र रचत असून, चुकीच्या बाबी पसविण्यात येत आहे.

    आता 10 आमदार केव्हा जातील, हेही समजणार नाही
    महाविकास आघाडीतील 50 आमदार केव्हा गेले, हे माहीतही पडले नाही. आता 10 आमदार केव्हा जातील, हेही समजणार नाही. महािवकास आघाडीतील आमदारांना हुकुमशाहीच्या पद्धतीने वागणूक देण्यात येत असून, आताच्या काळात काेणत्याच पक्षात हुकुमशाही नकाे. सकाळी उठून सुरू हाेणारा भाेंगा काेणालाच पसंत नाही. असा टाेला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी थेट नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला. चंद्रशेखल बावनकुळे म्हणाले, विराेधकांनी विराेधी पक्ष म्हणून याेग्य पद्धतीने काम करावे. विधायक प्रश्न मांडणे हे विराेध पक्षांचे काम असून, त्यावर शिंदे – फडणवीस सरकार याेग्य निर्णय घेईल. हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

    महािवकास आघाडीत धुसफूस
    महािवकास आघाडीत धुसफूस सुरू असून, सन २०१४मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये तर त्यांच्याकडे उमेदवारही नसतील, असा टाेला बानवकुळे यांनी विराेधकांना टाेला लगावला. नाशिक पदवीधर मतदारसंघात कांॅग्रेसच्या उमेदवार एबी फाॅर्मच घेतला नाही. नागपूरमध्ये चार उमेदवार बदलण्यात आले. िवधान परिषद िनवडणुकीत चंद्रकांत हंडाेरेंना हरविण्यात आले, असेही ते म्हणाले. ठाकरे गटाला टाेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता असून, यावरही भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाष्य केले. काेणते व कुठे शक्तिप्रर्दशन करावे, हा त्यांचा प्रश्न असून, यापूर्वीच्या ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांचा पेनही चालत नव्हता, असा टाेला त्यांनी थेट नाव न घेता महािवकास आघाडीच्या नेत्यांना लागावला.