मुंबईमधील प्रतिष्ठित डेव्हिड ससून लायब्ररी अँड रीडिंग रूम कात टाकणार; डागडुजीकरिता JSW च्या वतीने करारावर स्वाक्षरी

जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या वतीने या लोकमान्य ग्रंथालयाचे जतन आणि संवर्धनाकरिता जेएसडब्ल्यू फाऊंडेशन तांत्रिक आणि वित्तीय साह्य उपलब्ध करून देणार आहे. जेएसडब्ल्यूने हरमेस, काळा घोडा असोसिएशन, मुंबईतील इस्त्रायल महावाणिज्य दूतावास आणि इतरांसमवेत या प्रकल्पाच्या संवर्धन कार्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता हातमिळवणी केली आहे.

    मुंबई :डेव्हिड ससून लायब्ररी अँड रीडिंग रूमच्या (David Sassoon Library and Reading Room) वतीने $ १३ बिलियन अमेरिकन डॉलर्स किंमतीच्या जेएसडब्ल्यू ग्रुपची सामाजिक विकास शाखा, जेएसडब्ल्यू फाऊंडेशन समवेत सामंजस्य करार (एमओयु)वर स्वाक्षरी करण्यात आली. मुंबईतील काळा घोडा भागात असलेल्या प्रतिष्ठित डेव्हिड ससून ग्रंथालयाचे जतन आणि संवर्धन करण्याकरिता हा करार महत्त्वपूर्ण ठरतो.

    या करारानुसार, जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या वतीने या लोकमान्य ग्रंथालयाचे जतन आणि संवर्धनाकरिता जेएसडब्ल्यू फाऊंडेशन तांत्रिक आणि वित्तीय साह्य उपलब्ध करून देणार आहे. जेएसडब्ल्यूने हरमेस, काळा घोडा असोसिएशन, मुंबईतील इस्त्रायल महावाणिज्य दूतावास आणि इतरांसमवेत या प्रकल्पाच्या संवर्धन कार्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता हातमिळवणी केली आहे. डेव्हिड ससून ग्रंथालयाचे संवर्धन कार्य २०२३ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

    या प्रतिष्ठित ग्रंथालय डागडुजी कामाच्या करारावर बोलताना जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल म्हणाल्या की, “डेव्हिड ससून ग्रंथालय, हरमेस, काळा घोडा असोसिएशन, मुंबईतील इस्त्रायल महावाणिज्य दूतावास आणि अन्य उदार दानशूरांसमवेत शहरातील जुन्या ग्रंथालयाच्या डागडुजीच्या कामासाठी पुढाकार घेताना आम्हाला आनंद वाटतो आहे. मागील दोन दशकांपासून, डेव्हिड ससून लायब्ररीने मी आणि माझ्यासारख्या लक्षावधी लोकांचे -प्रामुख्याने काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल दरम्यान स्वागतच केले आहे. हा एमओयु म्हणजे परस्पर देवघेवसंबंधी मार्ग आहे, मुंबईच्या कला आणि वारसा परिघात शिक्षणाचे केंद्र म्हणून या प्रतिष्ठित ग्रंथालयाचा रुबाब पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. हे ग्रंथालय एल्फिन्स्टन महाविद्यालय, सीएसएमव्हीएस वस्तूसंग्रहालय आणि अन्य कलादालनांसारख्या इतर शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांपासून जवळच असल्याने मुंबईच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरले. आम्ही या नूतनीकरण प्रकल्पासाठी भारताच्या सर्वात सन्माननीय वारसा संवर्धन वास्तूविशारद आभा नरेन लांबहा यांच्या समवेत हातमिळवणी करत आहोत.”

    डेव्हिड ससून लायब्ररी अँड रीडिंग रूम कमिटीचे अध्यक्ष हेमंत भालेकर यांच्या अनुसार, “आम्ही बऱ्याच काळापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होतो. ग्रंथलयाच्या इमारतीचा मूळ दिमाख पुन्हा परतून येणार असल्याचा आनंद आमची पूर्ण कमिटी आणि सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. डेव्हिड ससून ग्रंथालय आणि वाचन मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यात पुढाकार घेतलेले दानशूर तसेच संगीता जिंदाल व आभा लांबहा यांचे विशेष आभार मानतो.”

    आभा नारायण लांबहाच्या संस्थापिका आणि प्रमुख वास्तूविशारद आभा नारायण लांबहा सांगतात की, “या प्रतिष्ठित ग्रंथालयाच्या जादुई वारशाचे संवर्धन करण्यासाठी या प्रकल्पात संगीता जिंदाल आणि डेव्हिड ससून लायब्ररीच्या टीमसमवेत काम करताना आनंद होतो आहे. मुंबईच्या व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एनसेंबल्समधील युनेस्को जागतिक वारसा स्थळांतील एक पुरातन वास्तू म्हणून डेव्हिड ससून लायब्ररीकडे पाहिले जाते. या वास्तूच्या डागडुजीत ग्रंथालयाचे स्थापत्य तसेच अंतर्गत सजावटीवर विशेष लक्ष राहील. तिच्या मूळ अंतर्गत आणि बाह्य आरेखनासह लायब्ररीचे अस्सल घसरते छत, मूळ ढाचा, आतील जागा आणि एकंदर वास्तू स्थापत्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करताना ऐतिहासिक सजावटीचे संवर्धन कटाक्षाने करण्यात येईल.

    मुंबई शहरातील काळा घोडा परिसरातील ऐतिहासिक कला परिघात डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूम ही पहिल्या दर्जाची वारसा इमारत आहे. हे मुंबईमधील सध्या अस्तित्वात असलेले सर्वात जुने ग्रंथालय मानले जाते. काळा घोडा भागात १८७० मध्ये बांधण्यात आलेली ही पहिली इमारत आहे. तिचे आरेखन गॉसलिंग अँड कॅम्पबेलच्या वतीने तयार करण्यात आले होते. तसेच बांधकामासाठी मालाड स्टोन आणि चुनखडक वापरण्यात आला होता. त्यामुळे ही इमारत अधिकच वैशिष्ट्यपूर्ण झाली.

    हे व्हिक्टोरीयन निओगॉथिक शैलीतील बांधकाम पहिल्यांदा वस्तूसंग्रहालय आणि यंत्रविषयक रचना तसेच वास्तूस्थापत्य आरेखन ग्रंथालय म्हणून करण्यात आले. सुरुवातीच्या काळात तिचा वापर टाकसाळ आणि सरकारी गोदीत काम करणारे परदेशी मॅकेनिक समूह करत होते. कालांतराने संस्थेचे कामकाज मंदावल्याने १९३८ साली तिचे नाव डेव्हिड ससून लायब्ररी अँड रीडिंग रूम असे नामांतर करण्यात आले. हे नाव सर डेव्हिड ससून या बगदादी ज्यू व्यापाऱ्याच्या नावावरून पडले, त्यांनी या प्रतिष्ठित वास्तूच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.

    सध्याच्या काळात तरूण विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक डेव्हिड ससून लायब्ररी अँड रीडिंग रूमचा लाभ घेतात. ग्रंथालयाचे प्रवेशद्वार हे एखाद्या कलादालनाहून दुप्पट क्षमतेचे आहे, त्या रस्त्यावरील जहांगीर आर्ट गॅलरीकडून तिचा विस्तार होतो. या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या जिल्ह्यात अगदी मोजक्याच खुल्या हिरव्या जागा आहेत, डेव्हिड ससून लायब्ररीची बाग त्यापैकीच एक! कायम वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवरील आल्हाददायक विसावा.. ही बाग म्हणजे वार्षिक काळा घोडा कला महोत्सवाचा मानबिंदू मानले जाते.

    जेएसडब्ल्यू फाऊंडेशनबद्दल: जेएसडब्ल्यू फाऊंडेशन ही$ १३ बिलियन अमेरिकन डॉलर किंमतीच्या जेएसडब्ल्यू ग्रुपची सामाजिक विकास शाखा आहे. जेएसडब्ल्यू समूह हा भारतातील अग्रगण्य व्यवसाय केंद्रांपैकी एक आहे. मागील तीन दशकांपासून ग्रामीण समुदायांचे सबलीकरण करण्याची समृद्ध परंपरा आणि प्रदीर्घ ट्रॅक रेकॉर्ड फाऊंडेशन राखून आहे. या समाज कल्याणाचा वसा घेतलेल्या संस्थेचे मुख्य लक्ष्य शिक्षण, आरोग्य आणि पोषण, कौशल्य विकास, ग्रामीण बीपीओ, पर्यावरण आणि पाणी, क्रीडा, कला व वारसा हे आहे. या संस्थेला कार्यक्षेत्राचा दांडगा अनुभव असून ११ भारतीय राज्यांच्या २२ ग्रामीण ठिकाणी काम चालते. जेएसडब्ल्यू प्रकल्प आणि बंदरांच्या सभोवती असलेल्या गावांमधील ग्रामस्थांच्या विकासावर प्रामुख्याने विशेष भर देण्यात येतो. जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे अर्थवाही मार्गाने भारताच्या सामाजिक विकासात योगदान देण्याचे काम कंपनीच्या कार्यक्षेत्राबाहेरही चालते.

    कोविड-१९ महासाथीदरम्यान या फाऊंडेशनने विविध समुदाय आणि कुटुंबांना सर्वच ठिकाणी अन्न आणि आरोग्य देखभाल सुविधा उपलब्ध करून दिल्या. जेएसडब्ल्यू फाऊंडेशचा सर्वसमावेशक जीवन-चक्र आधारीत व्यवहार भारतामधील लक्षावधीहून अधिक वंचित घटकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. संस्थेच्या वतीने कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटल चालविण्यात येतात. या माध्यमातून १००,००० रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच संस्थेने शैक्षणिक कार्यक्षेत्रात पुढाकार घेतल्याने ग्रामीण भागातील १३०,००० पेक्षा अधिक वंचित घटकांमधील बालकांवर सकारात्मक परिणाम दिसून आला, तर कृषी, महिला बचत गट आणि ग्रामीण बीपीओ उपक्रमांनी १६,००० शेतकरी आणि १०,००० ग्रामीण महिलांना नवीन रोजगार स्त्रोताची निर्मिती केली.

    या फाऊंडेशनने स्वच्छतेची कास धरत गावांत ७५०० हून अधिक सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून दिली. २००,००० हून अधिक गरजूना शासनमान्य कल्याणकारी योजनांद्वारे मदत मिळवून दिली. कला आणि वारसा संवर्धनात जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे कार्य असून भारतीय वारसा स्थळांवर विशेष भर देण्यात येतो. त्यांच्या पुढाकारातून हम्पी येथील चंद्रमौलेश्वर मंदिर, मुंबईमधील केन्नेसेथ स्यांगोंग संवर्धन करण्यात आले. या संस्थेच्या वतीने करण्यात येणाऱ्या संवर्धनाच्या कामाची प्रशंसा जगभर झाली असून अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान आजवर लाभला आहे.