संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गेल्या दोन आठवड्यांत देशभरात टोमॅटोचे दर चारपट तर काही ठिकाणी त्यापेक्षाही अधिक वाढले आहेत. आता दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

  मुंबई : टोमॅटोचे दर (Tomato Price) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वाढत असल्याचे दिसत आहे. पावसामुळे जवळपास सर्वच भाज्यांचे दर (Rates of Vegitables) वाढले आहेत. या वाढत्या महागाईमुळे (Inflation) कंबरडे आधीच मोडले असताना आता भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. त्यातून दिलासा मिळण्याची आशा असताना दर आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

  गेल्या दोन आठवड्यांत देशभरात टोमॅटोचे दर चारपट तर काही ठिकाणी त्यापेक्षाही अधिक वाढले आहेत. आता दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या खरेदी केलेल्या टोमॅटोंचे सर्वाधिक वाढ नोंदवलेल्या भागात वितरण करण्यास सांगितले आहे.

  आणखी टंचाई होणार

  महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे. शुक्रवारपासून दिल्लीत सवलतीच्या दराने टोमॅटो विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रात आणखी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  महागाईत 4.81% वाढ

  जून महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांकात (सीपीआय) वाढ झाली असून, हा निर्देशांक 4.81 टक्क्यांवर गेला आहे. भाजीपाला आणि त्यातही टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे सांख्यिकी मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सीपीआय निर्देशांकातील खाद्यान्न किमत इंडेक्स (सीएफपीआय) 2.96% वरून 4.49% वर गेला आहे. जून महिन्यात ग्रामीण भागातील महागाई दर 4.72% इतका होता तर शहरी भागातील महागाई दर 4.96% इतका होता.