कल्याणमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना, चालक संतापले

प्रशासन काय उपाययोजना करेल आणि वाहनाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार? अशी मागणी करण्यात आली आहे.

    कल्याण स्टेशन मुरूबाड रोड बाईचा पुतळा, उल्हासनगर कडे जाणारा वालधुनी उड्डाण पूल मार्ग हा नेहमीच होणाऱ्या वाहनांच्या वाहतूक कोंडीमुळे खोळंबा मार्ग बनला आहे. कल्याणच्या वालधुनी ते रामबागपर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरच्या या परिसरात वाहनांची वाहतूक कोंडी ही समस्या सुटत नसल्याचे होणाऱ्या वाहनांच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एफ केबिन चौकाजवळ ट्रॅफिक जाम होणे. हे नित्याच्या नियम बनला असल्याचा आरोप वाहन चालकसह, प्रवाशांकडून केला जात आहे. चौकात एकच ट्रॅफिक वॉर्डन तैनात असून तो नेहमी वाहतूक व्यवस्थापित करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे स्थानिकाचे म्हणणे असून वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे वाहन चालकसह प्रवाशी देखील हैरान झाले आहेत.

    सर्व वाहने अडकून पडल्याने नागरिकांची दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एफ केबिन चौकाजवळील हा रस्ता वाहतूक कोंडीने खोळंबा मार्ग झाल्याने उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या ५ मिनिटांत या रस्त्याने कल्याण स्टेशनकडे पोहचता येते परंतु वाहतूक कोंडीमुळे तासंतास हा रस्ता पार करण्यासाठी लागत आहे. हे दुर्दैव म्हणावे की काय अशी वेळ आली आहे? कल्याण स्टेशन, रामबाग बाईचा पुतळा स्टेटबँक आँफ इंडिया मुरुबाड या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकासह प्रवास करणाऱ्या प्रवाशाना होत असणाऱ्या या वाहनांच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला असून यावर प्रशासन काय उपाययोजना करेल आणि वाहनाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार? अशी मागणी करण्यात आली आहे.

    एफ केबिन परिसरातील रहिवासी फिरोज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफ केबिन चौकात वाहतूक पोलीस नेहमीच गैरहजर असतात, त्यामुळे तिन्ही बाजूंनी येणारी वाहने एकमेकांचा रस्ता अडवतात, त्यानंतर संपूर्ण परिसराला याचा त्रास सहन करावा लागत आहे. एफ केबिनवर वाहतूक पोलिसांनी किमान चार पोलीस तैनात केल्यास एवढी वाहतूक कोंडी होणार नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.”

    “दररोज अंबरनाथहून कल्याणला दुचाकीवरून येणारे राजेश मोरे यांच्या म्हणण्यानुसार, घरातून ऑफिसला जाण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ तो वालधुनी ते रामबाग दरम्यानच्या वाहनांच्या वाहतूक कोंडी रहदारीत घालवतो.”

    कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीश बने यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सँटीसचे काम सुरू असून ,तसेच एफ केबिन परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रहदारीचा वेग मंदवतो, आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या देखील वाढवित रहदारी सुरळीतपणे चालू राहण्यासाठी उपाययोजना केली जाते.”