पंढरपूर उपनगरातील प्रश्न लवकरच लागणार मार्गी; अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

पंढरपूर शहरातील उपनगरामधील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मागील काही दिवसांपूर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ दखल घेतली आहे.

    पंढरपूर : पंढरपूर शहरातील उपनगरामधील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मागील काही दिवसांपूर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ दखल घेतली आहे. त्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्यास सूचना केल्यामुळे उपनगरातील लोकांचे आर्थिक नुकसान टळणार आहे.

    या उपनगरातील लोकांना अनेक वर्ष शेतसारा कर आणि नगरपालकेतील कर असे दोन्ही कर भरावे लागत होते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत होता. याबाबत चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे उपनगरातील लोकांनी आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यानुसार, पाटील यांनी १७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री यांना याबाबत एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात फक्त नगरपालिका कर घेण्यात यावा. या भागातील लोकांना नगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हेमध्ये समावेश करण्यात यावा. ‘एक घर, एक कर’ घेऊन नागरिकांचा आर्थिक बोजा कमी करावा, अशी मागणी केली होती.

    या निवेदनाची दखल घेण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र प्राप्त होताच हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने पंढरपूर नगरपालिकेसाठी २१ सप्टेंबर रोजी पत्र पाठविले असून, याबाबतची प्रत चेअरमन अभिजीत पाटील यांना देण्यात आली आहे.