नागपुरात पावसानं केलं शेतकऱ्यांच नुकसान, तब्बल 2 लाख हेक्टर वरील पिकांची नासाडी

नागपूर जिल्ह्यात 28 हजार हेक्टरसह नागपूर विभागात तब्बल 2 लाख हेक्टर वरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

    नागपूर : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात चांगलाच पाऊस झाला आहे. गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे.  नागपूर विभागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.

    नागपूर जिल्ह्यात 28 हजार हेक्टरसह नागपूर विभागात तब्बल 2 लाख हेक्टर वरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर 350 हेक्टर वरील शेतातील सुपीक जमीन पिकांसह पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.  त्यामुळे शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतपिकांचे युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत आहे. नागपूर विभागातील संपूर्ण तहसील कार्यालयातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून येत्या 8 ते 10 दिवसात पंचनाम्याचे कार्य पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर त्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.