आज मुंबईत भाजपाकडून शक्ती प्रदर्शन, पंतप्रधानांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणूक विजयाचा आनंदोत्सव साजरा होणार

विजयानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून, हिच रणनिती विधान परिषद निवडणुकीत सुद्धा अवलंबणार असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnvis) यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यात राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर (After rajya sabha election win) आज भाजपाकडून मुंबईत शक्ती प्रदर्शन करत आनंदोत्सव (Celebration) साजरा होणार आहे. आणि या आनंदोत्सवात चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी होणार आहेत.

    मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणूक (Rajya sabha election) मागील आठवड्यात पार पडली. ही निवडणूक अनेक कारणांसाठी चर्चेत राहिली. तसेच या निवडणुकीत घडलेल्या घडामोडींतून अजून राजकीय मंडळी (Political Leaders) बाहरे पडलेली दिसत नाही. याला कारणं सुद्धा अशीच आहेत. राज्यात सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उभे होते. भाजपाने (BJP) रणनिती आखत आपले तीन उमेदवार निवडणून आणले. तर शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान भाजपाचे मतदानातील नियोजन, विरोध पक्षातील लोकांना गाफिल ठेवत मतांची जुळवाजुळवी आणि अपक्षांची मोट बांधत भाजपाने आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांचा विजयाचा मार्ग सुकर केला.

    दरम्यान, या विजयानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून, हिच रणनिती विधान परिषद निवडणुकीत सुद्धा अवलंबणार असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnvis) यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यात राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर (After rajya sabha election win) आज भाजपाकडून मुंबईत शक्ती प्रदर्शन करत आनंदोत्सव (Celebration) साजरा होणार आहे. आणि या आनंदोत्सवात चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली असून, मोदींचे मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे.

    राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश मिळविलेबद्दल मुंबईतील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, किल्लाचंद गार्डन, गिरगांव चौपाटी येथे सायंकाळी ४:३० वाजता “आनंदोत्सव” साजरा होणार आहे. याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते स्वागताकरिता उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आज भाजपाकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे.