आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

श्रमिकांच्या बाजूंच्या ४४ कायद्यांपैकी २९ कायदे मागे घेऊन चार कमजोर कायदे आणू पाहत आहेत. त्यामुळेच आज प्रत्येकाला आरक्षणाचे गरज वाटते आहे हे दुःखदायक आहे.

    कल्याण : सध्या राज्यभरात आरक्षणाच्या मुद्द्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अनेक राजकीय नेते या मुद्द्यावर त्यांची मते मांडत आहेत त्याचबरोबर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी हा मुद्दा उचलला आहे. याविषयी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना आणि आदिवासीना आरक्षण दिले. ते देखील १० वर्षासाठी होते. त्यानंतर आरक्षणाची गरज राहू नये. मात्र आज उलटं होत आहे. तुमच्यावर शेतकरी विरोधी कायदे थोपवले जातात.

    श्रमिकांच्या बाजूंच्या ४४ कायद्यांपैकी २९ कायदे मागे घेऊन चार कमजोर कायदे आणू पाहत आहेत. त्यामुळेच आज प्रत्येकाला आरक्षणाचे गरज वाटते आहे हे दुःखदायक आहे. सगळ्यांना जाती धर्मापार एक माणूसकी म्हणून मतदाता नागरिक म्हणून अधिकार मिळावा तर मग आरक्षणाची गरज वाटणार नाही. आणि आरक्षण झाले तर त्याचे केवळ राजकीय कारण होता कामा नये. सामाजिक कार्यकर्त्या पाटकर यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेऊन कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करुन काही मागण्या केल्या. या भेटीपश्चात त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.