“बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे, आता…”, अजित पवार यांचा हल्लाबोल

मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं. याआधी ४० वर्षांच्या आतच वेगळे निर्णय घेण्यात आले. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळा निर्णय घेतला. इथून पुढं फक्त माझे ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझे ऐका,” अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली

    “मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं. याआधी ४० वर्षांच्या आतच वेगळे निर्णय घेण्यात आले. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळा निर्णय घेतला. इथून पुढं फक्त माझे ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझे ऐका,” अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं.

    अजित पवार म्हणाले, “माझे विचार अतिशय स्पष्ट असतात. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते. तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली.