राज्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल होणार जाहीर

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

    राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर होणार आहे. काल संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 78 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    राज्यातील २३८ ग्रामपंचायीची निवडणूक काल पार पडली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 36, धुळे 41, जळगाव 20, अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.