मुंबई : राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले.
आज ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. महाराष्ट्रात नक्की कोणाची सरशी, नक्की कुणाला धक्का? मिळणार हेही या निकालातून स्पष्ट होईल.या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.