The roof of a school in Amravati was damaged due to a cyclone

२९ जून पासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील कालापांढरी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आजही छप्पर उडालेले अवस्थेत आहे. ६ जून रोजी कालापांढरी गावातील चक्रीवादळाने शाळेचे छत उडाले होते. त्यामुळे या शाळेची दुरवस्था झालेय(The roof of a school in Amravati was damaged due to a cyclone).

    अमरावती : २९ जून पासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील कालापांढरी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आजही छप्पर उडालेले अवस्थेत आहे. ६ जून रोजी कालापांढरी गावातील चक्रीवादळाने शाळेचे छत उडाले होते. त्यामुळे या शाळेची दुरवस्था झालेय(The roof of a school in Amravati was damaged due to a cyclone).

    शाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना, संबंधित विभागाने कुठलीही काळजी घेतली नसल्याचं वास्तव पुढे आलं आहे.

    चक्रीवादळाने मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आता कसे शिक्षण घेणार हा प्रश्न कालापांढरी गावातील पालकांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत.