वारकऱ्यांची सेवा हे पिंपरी-चिंवडकरांचे भाग्य : आमदार महेश लांडगे

आषाढ वारी पालखी सोहळा हा आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाग्याचा आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासारखी संधी यानिमित्ताने मिळते. वर्षानुवर्षे चाललेली ही परंपरा आणि वारकऱ्यांची सेवा यापुढील काळातही निरंतर सुरू राहील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

  • जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत
  • पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे वारकऱ्यांसाठी फराळ वाटप

पिंपरी : श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदीच्या सानिध्यात पिंपरी-चिंचवड ही वारकऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. आषाढ वारी पालखी सोहळा हा आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाग्याचा आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासारखी संधी यानिमित्ताने मिळते. वर्षानुवर्षे चाललेली ही परंपरा आणि वारकऱ्यांची सेवा यापुढील काळातही निरंतर सुरू राहील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३३७ व्या आषढी वारी पालखी सोहळ्याचे निगडी, भक्ती-शिक्ती चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारकरी आणि भाविकांना फराळ आणि अल्पोपहार, जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आकुर्डी येथे मुक्कामासाठी पालखीसोहळा मार्गस्थ झाला. यावेळी शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोविडच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत पढरपूर आषाढी वारी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी कोविडचे सावट दूर झाले आहेत. त्यामुळे पालखी सोहळा उत्साहात सुरू आहे. मंगळवारी श्रीक्षेत्र देहूतून पाखली सोहळा मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार निगडीतील भक्ती-शक्ती चौकात जगद् गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे शहरवासीयांनी स्वागत केले. यावेळी आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यात आल्या. भाविकांना लाडू, पाण्याची बॉटल, फर्स्ट एड बॉक्स, टोप्या, फराळाचे साहित्य इत्यादी भेट देण्यात आले.