ज्यांच्या विरोधात बाळासाहे देवरस लढत राहिले, त्यांनाच शिवसेनेने सत्तेसाठी साथ दिली, जे.पी. नड्डा यांची ठाकरेंवर टीका

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपानं देश पातळीवर तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

    चंद्रपुर – जो महाराष्ट्र आपल्या शौर्यासाठी, पराक्रमासाठी ओळखला जात होता. ज्यांच्या विरोधात बाळासाहे देवरस नेहमी लढत राहिले सत्तेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना साथ दिली. अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टीका केली. राज्यात भाजप सरकार आल्यापासुन 3.75 लाख कोटींची परकीय गुणतपणूक करण्यात आली आहे.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली. मविआ सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केल्यांचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन हिंदुह्दयसमा्रटाच्या मुलाने सीबीआयकडे तपास देण्यापासून मागे फिरले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, अशी टीका नड्डा यांनी केली आहे. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोक खाली करायची वेळ आली.

    महाविकास आघडीमध्ये डिलरशीप, ब्रोकरेंज आणि ट्रान्सफर असा फंडा होता. खूप दुख: झाले होते की मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी 2019 मध्ये बाळासाहेबांचे विरोधक असणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. अशा लोकांना माफ करायचे का असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी उपस्थित केला आहे.