झेडपीच्या गेटवरील “या’ फलकाने वेधले लक्ष ; आता जनतेचंही गाऱ्हा णं ऐका जरा…

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लटकवलेल्या एका फलकांने येथील जनतेचे लक्ष वेधून घेतलं आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मार्चमध्ये मुदत संपल्याने प्रशासकराज सुरू आहे. जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी लोक दररोज येत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले मोर्चेही जिल्हा परिषदेच्या गेटवरच येतात.

    सोलापूर: जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लटकवलेल्या एका फलकांने येथील जनतेचे लक्ष वेधून घेतलं आहे.
    जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मार्चमध्ये मुदत संपल्याने प्रशासकराज सुरू आहे. जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी लोक दररोज येत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले मोर्चेही जिल्हा परिषदेच्या गेटवरच येतात. या मोर्चादरम्यान आलेल्या कार्यकर्त्याने आपल्या हातातील फलक झेडपीच्या गेटवर लटकावला आहे. “आमदार’ खासदार तुपाशी तर जनता उपाशी’ असा या फलकावर मजकूर आहे. कुणी झेडपीत कामामनिमित आलेल्या नागरिकांनीच हा फलक लावला आहे, तर कुणी म्हणत झेडपीच्या कारभारावर लक्ष वेधण्यासाठी हा फलक लावला आहे. गेटवर लावण्यात आलेला हा फलक सध्या चर्चेचा विषय झाला आहे, तरीही हा फलक येथून कुणी हटविला नाही, हे विशेष!