पूर्वीसारखी सहकार क्षेत्रात परिस्थिती राहिली नाही, खासगी कारखानदारी येतीये : शरद पवार

पूर्वीसारखी सहकार क्षेत्रात परिस्थिती राहिली नाही. सहकार क्षेत्रात खासगी कारखानदारी येत आहे. खासगी आणि सहकारी कारखान्याची संख्या एक समान आहे. पूर्वीसारख्या सहकारी संस्था चालवल्या, वाढवल्या तरच त्या टिकतील. नाही तर खासगी कारखानदारीला कोण रोखू शकणार नाही, अशी चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

सांगली : पूर्वीसारखी सहकार क्षेत्रात परिस्थिती राहिली नाही. सहकार क्षेत्रात खासगी कारखानदारी येत आहे. खासगी आणि सहकारी कारखान्याची संख्या एक समान आहे. पूर्वीसारख्या सहकारी संस्था चालवल्या, वाढवल्या तरच त्या टिकतील. नाही तर खासगी कारखानदारीला कोण रोखू शकणार नाही, अशी चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्याच्या प्रसंगी शरद पवार हे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शरद पवार भाषण सुरू असताना, पवार यांनी सुशील कुमार शिंदे यांना विचारलं किती वेळा तुम्ही मुख्यमंत्री होता? त्यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले, मी एक वेळा मुख्यमंत्री होतो, पण पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही.

शरद पवार पुढे म्हणाले, तुमचं काही सांगता येत नाही, दोन्ही नेत्यांच्या मधील संवादानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर याच कार्यक्रमात भाजपचे नेते आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कौतुक केलं. तर दुसरीकडे सहकार क्षेत्रातील उणिवांची सुद्धा जाणीव करून दिली.