कल्याण पश्चिमेत मोकाट रेड्याचा धुमाकूळ

अग्निशमन दलाच्या जवानांनी मोकाट सुटलेल्या या रेड्याला काबूत आण्यासाठी तासभर मेहनत घेतली. अखेर त्याला दोरखंडाने खांबाला बांधून ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

    कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला परिसरात बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मोकाट सुटलेल्या रेड्याने धुमाकूळ घातला. त्यांच्या सैरावैरा धावण्याने तो मारील या भितीने नागरिकांची पळता भुई झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुदैवाने या मध्ये कोणाला दुखापत वा हानी झाली नाही.

    अग्निशमन दलाच्या जवानांनी मोकाट सुटलेल्या या रेड्याला काबूत आण्यासाठी तासभर मेहनत घेतली. अखेर त्याला दोरखंडाने खांबाला बांधून ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. हा रेडा कोणचा हा सवाल आता उभा राहिला असून या परिसरात तबेल्यांची संख्या मोठी असून हा रेडा कुठून आला यांचा मालक कोण? असा सवाल यानिमित्ताने होत आहे. या प्रकारामुळे शहारातील मोकाट जनावरे, कोंडवाड्यासह, पशुवैद्यकीय अधिकारी प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे.