The smugglers attacked the forest officials and tried to kill them

विनोद फर्निचर समोर सागवानाची लाकडे भरलेला एक ट्रॅक्टर दिसला. त्यांनी चालक दिनेश कटरे याच्याकडे लाकडे कापण्याचा परवाना विचारला. दरम्यान, त्याने काहीही उत्तर दिले नाही. इतक्यात विनोद फर्निचरचे संचालक विनोद जैन तिथे आले. त्यांनी त्याठिकाणी असलेले वनविकास महामंडळाचे आरएफओ मंगेश बागडे यांच्या अंगावर दुचाकी चढविली.

    गोंदिया : वनविकास महामंडळाच्या (Forestry Corporation) अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे वाहतूक होत असलेल्या सागवान भरलेले ट्रॅक्टर पकडले. याचा राग मनात ठेवून घटनास्थळावर असलेल्या वनविकास महामंडळाचे सालेकसा आरएफओ (Saleksa RFO) यांच्यावर दुचाकी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी (ता. 2) सालेकसा शहरात दरेकसा मार्गावर घडला. या प्रकरणी पोलिसांनी फर्निचर मालक आणि ट्रॅक्टर चालकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे फर्निचर दुकान मालक विनोद जैन आणि ट्रॅक्टर चालक दिनेश कटरे अशी आहेत.

    सालेकसा तालुक्यात (Saleksa Taluka) अमाप जंगल आहे. तालुक्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली. या तालुक्यात मौल्यवान वनसंपदा आहे. तालुक्यातील जंगलाचे रक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र वनविभाग (Maharashtra Forest Department) आणि वन विकास महामंडळ (Forest Development Corporation) यांच्याकडे आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनतस्करी वाढल्याची तक्रार वनविकास महामंडळाचे उपवनसंरक्षक (भारतीय वनसेवा) (Conservator of Forests) (Indian Forest Service) नितीनकुमार (Nitin Kumar) सालेकसा तालुक्यात दौऱ्यावर होते.

    दरम्यान, त्यांना दरेकसा कडून सालेकसाच्या दिशेने अवैधरित्या सागवानाची कत्तल करून लाकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे ते गस्तीवर असताना तहसील कार्यालयासमोरील विनोद फर्निचर समोर सागवानाची लाकडे भरलेला एक ट्रॅक्टर दिसला. त्यांनी चालक दिनेश कटरे याच्याकडे लाकडे कापण्याचा परवाना विचारला. दरम्यान, त्याने काहीही उत्तर दिले नाही.

    इतक्यात विनोद फर्निचरचे संचालक विनोद जैन तिथे आले. त्यांनी त्याठिकाणी असलेले वनविकास महामंडळाचे आरएफओ मंगेश बागडे यांच्या अंगावर दुचाकी चढविली. यात ते कसेबसे बचावले. या प्रकरणी मंगेश बागडे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी विनोद जैन आणि चालक दिनेश कटरे यांना अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.