सर्पमैत्रिणीने पकडली आठ फुटी धामण

शिक्रापूर  येथील एका दुकानात आढळून आलेल्या आठ फुटी धामणला   एका सर्पमैत्रीण युवतीने पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले. या  सर्पमित्र युवतीच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.

    शिक्रापूर : शिक्रापूर  येथील एका दुकानात आढळून आलेल्या आठ फुटी धामणला   एका सर्पमैत्रीण युवतीने पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले. या  सर्पमित्र युवतीच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.

    शिक्रापूर येथील अजिंक्यतारा पार्किंग येथील कुमजाई ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात शुक्रवारी  सकाळच्या सुमारास एक भलामोठा साप असल्याचे नाना इंदलकर यांना दिसले.  त्यांनी तातडीने याबाबतची माहिती सर्पमैत्रीण पूजा बांगर यांना दिली.  त्यांनतर सर्पमैत्रीण बांगर, सर्पमित्र अमोल कुसाळकर, विक्रम ठाकूर, विशाल वाकळे यांनी तेथे ठिकाणी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी कपाटाच्या खाली भलामोठी  धामण  दिसून आली. दरम्यान,  पूजा बांगर हिने शिताफीने   धामणला पकडले.  पाहणी केली असता ती तब्बल आठ फुट  असल्याचे समोर आले.  एका युवतीने पकडलेल्या भल्या मोठ्या सापाला पाहून नागरिक देखील आचंबित झाले तर अनेकांनी युवतीचे कौतुक केले. त्यांनतर शिरुर वनविभागाचे वन रक्षक प्रमोद पाटील यांना माहिती देत सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.