रात्री घरात आलेल्या सापाचा बहीण भावाला दंश, दोघांची प्रकृती चिंताजनक

दोघांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी नेले असता प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

    वर्धा : वर्धा जिल्ह्यातील गिरड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास एका घरात सापाने प्रवेश करत सख्ख्या बहीण-भावाल दंश ( Snakebite ) केल्याची घटना उगडकीस आली आहे. या घटनेत दोघांचीही प्रकृती चिंताजनक असूनत्यांना वर्धेच्या सेवाग्राम येथील रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. योगेश नेहारे (वय15) आणि योगिता नेहारे (वय18) अशी त्यांची नावं आहेत.

    सध्या दोघांवरही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरु आहे. काल रात्री राजू नेहारे हे आपल्या कुटुंबियांसोबत घरात झोपले असताना त्यांच्य घरात सापाने प्रवेश केला. हा साप मण्यार जातीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सापाने झोपेत दोघंही बहिण भावाना दंश केला. या नंतर दोघांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी नेले असता प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सध्या दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती आहे.