
डोंबिवली : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पतीसोबत भांडण झाल्याने बायको मुलासह माहेरी निघून गेल्याने पती बायको मुलाना आणायला गेला, सासुने नकार दिल्याने जावयाने कल्याण पूर्वेतून सासूचे अपहरण करत तळोजा परिसरात डांबून ठेवले, इतकेच नव्हे तर रागाच्या भरात सासूला लोखंडी रॉड व कैचीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जावई भावेश मढवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जावयी भावेश मढवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत .
नवी मुंबई येथील तळोजा परिसरात भावेश मढवी हा त्याची पत्नी दिक्षिता आणीनेक वर्षाचा मुलासोबत राहतो. गेल्या काही महिन्यांपासून भावेश व दक्षता मध्ये वाद होत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून दिक्षिता मुलाला घेऊन कल्याण पूर्वेकडील मलंग रोड अमरदीप कॉलनी येथे आपल्या माहेरी आली होती. संतापलेल्याला भावेशने त्याचा मित्र सूरज म्हात्रे याला घेत अमरदीप कॉलनी गाठली. घरात आल्यानंतर सासू दीपाली खोकरे हिला माझी बायको कुठे आहे माझ्या मुलाला कुठे विकले असा विचारत सासूशी वाद घालण्यास सुरुवात केली. दिपाली यांना चाकूचा धाक दाखवत भावेश व सुरज यांनी पोलिस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने गाडीत जबदरदस्तीने गाडीत बसवले व नवी मुंबई येथील तळोजा आपल्या घरात डांबून ठेवले.
या ठिकाणी भावेश व सुरज या दोघांनी दिपाली यांना लोखंडी रोड ने मारहाण केली कैचीने मारहाण केली. या दरम्यान भावेशने आपल्या पत्नीला फोन करून मुलाला आणून दे तुझे आई माझ्या ताब्यात आहे असे सांगितले. दीक्षित आहे ना पोलिसांच्या मदतीने आईला तिथून सोडवला याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भावेश मडवी व सुरज म्हात्रे या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाच्या तपास मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी डीए सी सूर्यवंशी यांनी सुरू केलं. पोलिसांनी जावई भावेश मडवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे या दोघांनाही अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना उघडगी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी ज्ञानोबा सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत