भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात बालिकेचा मृत्यू

भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार महिलेला धडक दिल्याची घटना लुल्लानगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    पुणे : भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार महिलेला धडक दिल्याची घटना लुल्लानगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    शहाबानो सिराज खान (वय ३) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचा नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सकीना सिराज खान किरकोळ जखमी झाल्या. टेम्पोचालक नरसिंह कावरे (रा. आंबेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सिराज फिरोज खान (वय ३९, रा. सत्यम कशिश सोसायटी, कोंढवा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    दुचाकीस्वार सकीना आणि त्यांची मुलगी शहाबानाे लुल्लानगर परिसरातून निघाल्या होत्या. पारशी काॅलनी समोर भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील शहाबानोला गंभीर जखमी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहबानोचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.