Pune condemns Deputy Chief Minister Ajit Pawar's statement; Statements were made by PhD holders

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवन येथे पीएचडी (Ph.D) विद्यार्थ्यांच्या फेलोशिपबद्दल केलेल्या विधानाचा पीएचडीधारक विद्यार्थ्यांकडून बालगंधर्व चौक येथे निषेध नोंदवला.

  पुणे : आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत सारथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. दोनशे विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती देण्याची मर्यादा वाढविण्याची मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ‘पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?’ असा थेट सवाल केला होता. याचा विद्यार्थी निषेध व्यक्त करत आहेत.

  विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा हेतू भाजप सरकारचा
  फेलोशीप कमी करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा हेतू भाजप सरकारचा आहे हे स्पष्ट होते. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवण्यासाठी हे सरकार काम करत आहे. अशा प्रवृत्तींचा या महाराष्ट्रात ठिकठकाणी निषेध व्हायला हवा. असे सरकार विध्यार्थ्यांना फेलोशिप पासून दूर करून विध्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाही. असे यावेळी विद्यार्थी म्हणाले.
  फेलोशिपच्या माध्यमातून मदत
  सारथी, बारटी, महाज्योती अश्या संस्थांमधून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिपच्या माध्यमातून मदत करते. परंतू हा खर्च देण्यास परवडत नाही ही भूमिका सरकार घेऊन काय साध्य करणार? इतर गोष्टींसाठी सरकार कडे पैसे उपल्ब्ध आहेत परंतु विध्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे पुरवणे परवडत नसल्याचे यातून दिसत आहे असा सवाल त्यांनी केला.
  भाजप सरकरच्या विरोधात
  यावेळी भाजप सरकरच्या विरोधात तसेच सारथी,बार्टि, महाज्योती यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोध घोषणा बाजी करण्यात आली. पुणे शहर जिल्हा एन.एस.यू.आय.चे अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख, उपाध्यक्ष गौरी काळे, सनी रणदिवे, जयदीप सुर्यवंशी, पुष्कर पुंडे,विद्यार्थी कृतिसमितीचे राहुल ससाणे, तुकाराम शिंदे, रविराज कांबळे व पीएचडीचे विद्यार्थी उपस्थित होते.