साताऱ्यातील शिवतीर्थवरील शिव पुतळ्याला आज होणार हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी; महाआरती सोहळ्यासाठी शिवभक्त सज्ज

पोवई नाक्यावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता महारतीचे आयोजन करण्यात आले असून शंभर फुटी ध्वजाचे अनावरण नक्षत्र चे अध्यक्ष दमयंती राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे .

    सातारा : पोवई नाक्यावरील शिव पुतळ्याला शिवजयंतीच्या मुहूर्तावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने शाही शिवजयंती सोहळ्याची तयारी केली आहे . पोवई नाक्यावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता महारतीचे आयोजन करण्यात आले असून शंभर फुटी ध्वजाचे अनावरण नक्षत्र चे अध्यक्ष दमयंती राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे

    छत्रपती शिवरायांची 394 वी जयंती सातारा शहरांमध्ये विविध उपक्रमांनी साजरी होत आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवज्योती सोमवारी सकाळपासून साताऱ्यात येणारा असून त्यांचे स्वागत करण्यासाठी पोवई नाक्यावर स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे . शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा जिल्हा पोलिसांनी शिव पुतळ्यासह शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे . खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवतीर्थावर शंभर फुटी ध्वजाच्या अनावरण सोमवारी सकाळी नक्षत्र समूहाचे अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे .

    शिव पुतळ्याच्या जलाभिषेकासाठी सातारा जिल्ह्यातील पाच नद्यांचे पाणी आणण्यात येणार आहे . शिवतीर्थाचे सुशोभीकरणाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून आठ कोटीचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते शिवतीर्थावरील शिवपुतळ्याचा परिसर भगव्या झेंड्यांनी सुशोभित करण्यात आला आहे . आकर्षण म्हणजे पोवई नाक्यावरील शिव पुतळ्याला हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला .शिवजयंती महोत्सवासाठी सातारा शहरांमध्ये ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . तसेच अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर सुद्धा भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत.

    या निमित्ताने सकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक आणि त्यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे सातारा विकास आघाडीचे सर्व सदस्य तसेच उदयनराजे भोसले मित्र समूहाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे