
पुणेकरांची वाहने उचलण्यास वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) 'जालीम' उपाय शोधत टोईंग व्हॅनचे 'स्टेअरिंग' महिला कर्मचाऱ्यांच्या हातात दिले आहे. वाद टाळण्यासाठी पोलिसांना काढलेला उपाय मात्र, पुणेकरांवर हात उचलण्यापर्यंत गेल्याने 'पुणेकरांनो खा मार' असेच दिसत आहे. विशेष म्हणजे, मराठीत एक प्रसिद्ध म्हण आहे, 'चहापेक्षा किटली गरम' सध्या वाहतूक शाखेत असं काहीसं झालं आहे.
पुणे : पुणेकरांची वाहने उचलण्यास वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) ‘जालीम’ उपाय शोधत टोईंग व्हॅनचे ‘स्टेअरिंग’ महिला कर्मचाऱ्यांच्या हातात दिले आहे. वाद टाळण्यासाठी पोलिसांना काढलेला उपाय मात्र, पुणेकरांवर हात उचलण्यापर्यंत गेल्याने ‘पुणेकरांनो खा मार’ असेच दिसत आहे. विशेष म्हणजे, मराठीत एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘चहापेक्षा किटली गरम’ सध्या वाहतूक शाखेत असं काहीसं झालं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षा या गाड्या उचलण्यासाठी टोईंग कंपनीने (Towing Van) लावलेले कामगार जास्तच गरम अन् कडक पुणेकरांशी वागत असल्याचा अनुभव आहे. त्याचा प्रत्यय पुणेकरांना वेळोवेळी येत आहे. त्यात टोईंग व्हॅनने वाहन उचलण्यास लागणारा दंड पुणेकरांवर बोजा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पडत आहे. त्याला विरोध असतानाही प्रशासन मात्र कंपनीला मेहरबान आहे.
त्याचं झालं असं, हडपसरमधील महादेवनगर रमेश बराई (रा. हडपसर) यांचे फुटवेअरचे दुकान आहे. या दुकानासमोर एक दुचाकी उभी होती. त्याचे पेट्रोल गळत असल्याने रमेश व शेजारी काही व्यक्ती गाडी डब्बल स्टँडला लावून पाहत होते. यावेळी गाड्या उचलण्यासाठी ‘घिरट्या’ मारणारी वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॉन आली. प्रथम गाड्या उचलणारे तीन मुलं उतरली व गाडीजवळ आले. त्याचवेळी त्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी संवाध साधला. महिला कर्मचारी व्हॅनमधून खाली उतरल्या अन् या दुकानादाराला बोलल्या. तितक्यात एक कामगाराने दुकानदाराशी उद्धटपणे बोलत ‘ये थेरड्या’ म्हणत वाद घातला.
राग अनावर झाल्याने या दुकानदाराने विट उचलत कामगारांवर धावला. मग, काय महिला कर्मचाऱ्यांचाही आवाज वाढला. हा आवाज वाढताच तीन कामगारांनी दुकानदाराशी वाद घालत त्याला बेदम मारहाण केली. हे मारहाणीचे प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणात दुकानदारावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून, संबंधित टोईंग व्हॅनवरील कामगारावरही कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुणेकरांना या गाड्या उचलणाऱ्या तरुणांकडून येणारा अनुभव पुन्हा एकदा समोर आला आहे. त्याचे पडसाद चांगलेच उमटले असून, पुणेकर तीव्र विरोध करत आहेत.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांशी पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांचे वाद होतात, असे ठरवत शहरातील गाड्या उचलणाऱ्या टोईंग व्हॅनचे स्टेअरींग महिला कर्मचाऱ्यांच्या हातात दिले आहे. वाद टाळण्यासाठी हा उपाय काढल्याचे वाहतूक शाखेकडून सांगितले जाते. पण, महिला किंवा पुरूष कर्मचारी असो, त्यांच्यापेक्षा मोठा आवाज हा गाड्या उतलणाऱ्यांचा असतो, हे पोलीस बहुतेक वरिष्ठ विसरले आहेत. शहरात दुचाकी उचलण्यासाठी 19 वाहने आहेत. तर, चारचाकी उचलण्यासाठी 10 वाहने आहेत. या वाहनांवर महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी देण्यात आली आहे. त्यांना दररोज वाहने उचलण्याचे टार्गेट देखील दिले आहे. त्यामुळे त्यांना हे टार्गेट पुर्ण करणे क्रमप्राप्त आहे. टार्गेटच्या मागे लागल्याने अशा घटना वाढण्याची घडतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा हा उपाय खरोरच वाद टाळणार की वाढवणार असा प्रश्न आहे.
कामगारांची भाषाच कडक..!
वाहने उचलण्यासाठी असणाऱ्या कामगार तरुणांची भाषा कायमच कडक असल्याचा अनुभव आहे. कंपनीकडून हे कामगार ठेवले गेले आहेत. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यातही गाडी उचलून नेल्यास वाहतूक शाखेच्या कार्यालयात गेल्यानंतर प्रथम पोलिसांआधी या कंपनीचे लोकच तुम्हाला भेटतात अन् कोणती गाडी आहे, किती दंड आहे पाहतो, थांबा असे प्रश्न विचारतात. जरा जास्तच काही असेल तर वाहतूक पोलिसांपर्यत वाहन चालकांना पोहचता येत.
वाहतूक शाखा कायम चर्चेत…
पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग कायमच कुठल्या अन् कुठल्या चर्चेत असतो. नुकतेच दोन तरुणांनी वाहतूक पोलीस आढवत असल्यांविरोधात रिल्स तयार केले होते. ते प्रचंड व्हायरल झाले होते. त्यापुर्वी एका तरुणाला गावी जाताना अडविल्याने त्याने अलका चौकात झोपून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते. हे प्रकरण मिटविण्यासाठी पुन्हा वाहतूक विभागाची दमछाक झाली होती. त्यानंतर आता थेट मारहाणीचे प्रकरण समोर आल्याने वाहतूक शाखेला नेमकं काम कुठल्या पद्धतीत सुरू आहे, याची जाणीव पुन्हा होऊ लागली आहे.