भुयारी मेट्रो मार्गिकेची चाचणी लवकरच होणार

शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिके अंतर्गत विविध कामांनी वेग घेतला असून भुयारी मार्गात रूळ टाकण्याचे तसेच विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मेट्रो सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या या कामांनी गती घेतल्याने येत्या काही दिवसांत भुयारी मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे.

    पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिके अंतर्गत विविध कामांनी वेग घेतला असून भुयारी मार्गात रूळ टाकण्याचे तसेच विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मेट्रो सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या या कामांनी गती घेतल्याने येत्या काही दिवसांत भुयारी मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे.

    मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. ही मार्गिका शिवाजीनगर स्थानकापर्यंत उन्नत असून तेथून स्वारगेट पर्यंतची मार्गिका भुयारी आहे. एकूण सहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाता शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी पाच स्थानके आहेत.

    भुयारी मेट्रो मार्गिकेसाठी दोन्ही बाजूने प्रत्येकी सहा-सहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता रूळ टाकणे, विद्युत तारा बसविणे, सिग्नल यंत्रणा उभारणे अशी कामे सुरू झाली आहेत.