MPSC विद्यार्थ्यांच्या मोठ्या लढ्याला यश, काय होता संघर्ष, विद्यार्थी किती दिवसांपासून करीत होते आंदोलन? : जाणून घ्या सविस्तर

मपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

    मुंबई : एमपीएसीचा (MPSC) अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करणार आहे, त्यामुळे शिंदे – फडणविस (Shinde-Fadanvis) सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

    आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं.

    एमपीएसी विद्यार्थ्यांचा संघर्ष

    एमपीएससीने नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला होता. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यामुळे हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ‘एमपीएससी’च्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत होते. सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.