बारावी परीक्षेत दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवती यश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. करिअरची दिशा निश्चित करणाऱ्या बारावीच्या निकालाकडे दिशा ॲकॅडमीचे विद्यार्थी आणि पालक लक्ष लावून होते.

    बावधन : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. करिअरची दिशा निश्चित करणाऱ्या बारावीच्या निकालाकडे दिशा ॲकॅडमीचे विद्यार्थी आणि पालक लक्ष लावून होते. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली आणि ८ जूनला ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात दिशाच्या ३२० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत बाजी मारली.

    तब्बल २०७ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शनसह मिळवलेला फस्ट क्लास, ३१७ विद्यार्थ्यांनी मिळवलेला फस्ट क्लास आणि ३ विद्यार्थ्यांनी मिळवलेला सेकंड क्लास म्हणजेच दिशातील दर्जेदार शिक्षणाची पोच पावतीच होय. आपल्या यशाचा आलेख चढता ठेवताना दिशाच्या २४ विद्यार्थ्यांनी ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. यामध्ये मुलींची सरशी दिसून आली. दिशा ॲकॅडमीचा सुमित पिसाळ ९२.५० टक्के गुण मिळवत पहिल्या रँकवर आहे.

    वेदांतिका पोरे आणि पुष्कर येवले या दोघांनी ९० टक्के मिळवत दुसऱ्या रँकवर कब्जा मिळवला आहे. ८९.६७ टक्के गुण मिळवत चैतन्या पाटील तिसऱ्या रँकवर आहे. अधिकाधिक गुणांची कमाई करत ८० ते ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ आहे, तर १६७ विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्के गुण मिळवले आहेत.

    विद्यार्थ्यांनी मिळवलेल्य यशाबद्दल बोलताना दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम म्हणाले, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार या चक्रात न आडकता दिशा ॲकॅडमी सुरूवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी कटीबद्ध होती. वेळापत्रकाप्रमाणे केलेली अभ्यासाची आखणी, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळोवेळी घेतलेल्या सराव परीक्षा, शंकाचे समाधान हे यशापर्यंत पोहचण्याची वाट सुकर करत होते. जिद्द, चिकाटीच्या जोरावर आमचे विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते; या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजेच घवघवीत यश होय.