कास धरण उंचीच्या कामाची अधीक्षक अभियंत्यांनी केली पाहणी; नगरपरिषद संचालनालयाकडून मिळणार आराखड्याला गती

नगरपरिषद संचालनालयाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी सोनवणे (Pallavi Sonawane) यांनी मंगळवारी पाच धरण उंचीच्या कामाची पाहणी केली. तसेच प्रस्तावित आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

    सातारा : नगरपरिषद संचालनालयाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी सोनवणे (Pallavi Sonawane) यांनी मंगळवारी पाच धरण उंचीच्या कामाची पाहणी केली. तसेच प्रस्तावित आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरपालिकेचे मुख्य अभियंता दिलीप चिद्र, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे इत्यादी उपस्थित होते.

    सोनवणे या मंगळवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या. इचलकरंजी महानगरपालिकेला भेट दिल्यानंतर दुपारी त्यांनी सातारा नगरपालिकेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेतली. त्यानंतर सोनवणे यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर कास धरणाच्या प्रस्तावित कामांना भेट दिली. धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या मजबुती करण्याचा सोनावणे येणे आढावा घेतला. तसेच प्रस्तावित पाईपलाईनचे काम लवकरच सुरू होणार असून, त्याकरता काही काळ कास्टचे पाणी उचलून पुढील कॅनॉलमध्ये टाकण्यात येणार आहे.

    या संदर्भातही त्यांनी कामाची माहिती घेतली धरणात सध्या किती पाणीसाठा आहे. तसेच पाण्याची नियोजन कसे आहे याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. या संदर्भात नगरपरिषद संचालनालयाला आगामी कामांच्या संदर्भात किती निधी दिला जाईल, याचा लवकरच प्रस्ताव वित्त विभागाला सादर करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.