तीन दिवस नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या दौऱ्याच्या दिवशी फक्त मंदिर बंद राहणार

14 तारखेच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी येणार असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    पुणे : देहूतील संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Mandir) तीन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयात थोडा बदल करण्यात आला आहे. मंदिर तीन दिवस बंद न राहता ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येणार आहेत त्या दिवशी म्हणजे फक्त एक दिवस मंदिर बंद राहणार आहे. अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार आहे. त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता या निर्णयात थोडा बदल करण्यात आला असून ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत फक्त त्याच दिवशी मंदिर बंद राहणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. 14 तारखेच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी येणार असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.