ठाकरे सरकारची ‘या’ दोन शब्दांनी वाट लावली; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

भाजप नेते निलेश राणे ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारची या दोन शब्दांनी वाट लावली “नॉट रिचेबल” अगोदर सीएम नॉट रिचेबल आता आमदार नॉट रिचेबल.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

    मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या मतदानानंतर हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले. नंतर ते आता गुवाहाटीत आमदारांना घेऊन गेले आहेत. यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान अशातच भाजप नेते निलेश राणे ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

    निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

    “ठाकरे सरकारची या दोन शब्दांनी वाट लावली “नॉट रिचेबल” अगोदर सीएम नॉट रिचेबल आता आमदार नॉट रिचेबल.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडील आकडा हा महाविकास आघाडीचीही धडधड वाढवत आहे. शिंदेंच्या बंडानंतर मविआ सरकारही अडचणीत सापडले आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला रामराम ठोकला आहे. तर शिंदेंसह आमदारांनी आसाममध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.