कचनेर येथील जैन मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची चोरी; 24 तासात लावला छडा

संभाजीनगरच्या कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी त्यासारखीच दिसणारी पितळाची मूर्ती ठेवण्यात आली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे.

    संभाजीनगरच्या कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी त्यासारखीच दिसणारी पितळाची मूर्ती ठेवण्यात आली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. दोनच दिवसात पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. संभाजीनगरच्या कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ या जैन मंदिरात हा सर्व प्रकार घडला होता.

    मंदिरात 1 कोटी किमतीची सोन्याची मूर्ती महिन्याभरापूर्वीच बसवण्यात आली होती. सोन्याच्या मूर्तीची चोरी केल्यानंतर त्याजागी हुबेहूब पितळेची मूर्ती ठेवण्यात आली होती. मात्र शनिवारी मूर्तीचा सोन्याचा मुलामा आणि रंग उतरायला लागल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला. यानंतर जैन धर्मियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    संभाजीनगरच्या कचनेर मधील जैन मंदिर मूर्ती चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयीत शिष्यानेच ही मूर्ती 15 तारखेला चोरली असल्याचा पुढे आले आहे. आरोपीला परराज्यातून पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दोन किलो सोन्याची भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती चोरली होती तिला वितळवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र हे सगळं सोनं पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे. दोनच दिवसात पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केले आहे.

    अशी उघडकीस आली चोरी

    मंदिराच्या समितीचे महामंत्री विनोद लोहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार; भगवान पार्श्वनाथांची सोन्याची मूर्ती बदलल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त ललित पाटणी यांनी लोहाडे यांना शुक्रवारी (दि. 23) रात्री 9.30 वाजता दिली. त्यानुसार शनिवारी सकाळी 10 वाजता मंदिराचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाने मूर्तीची पाहणी केली. तेव्हा मूर्तीमध्ये बदल जाणवला. बदललेल्या मूर्तीचे वजन केल्यानंतर ते 942 ग्रॅम भरले. प्रत्यक्षात सोन्याची मूर्ती 2 किलो 56 ग्रॅमची होती. त्यानंतर खासगी सुवर्णकार निलेश पाटणी यांच्याकडून मूर्तीची तपासणी केल्यानंतर बदललेली मूर्ती पितळेची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, निरीक्षक देविदास गात, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्यासह इतरांनी मंदिराला भेट देत तपासाला सुरुवात केली होती.