दिवाळी भेट देण्याच्या आमिषाने महिलेच्या दागिन्यांची चोरी ; रास्ता पेठेतील घटना

दिवाळी भेट देण्याच्या आमिषाने पादचारी महिलेच्या पिशवीतून ९२ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकात घडली.

    पुणे : दिवाळी भेट देण्याच्या आमिषाने पादचारी महिलेच्या पिशवीतून ९२ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकात घडली.

    याबाबत एका ५२ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रविवार पेठेत राहायला आहेत. त्या रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकातून निघाल्या होत्या. महावितरण कार्यालयापासून काही अंतरावर एका डेअरीजवळ चोरट्यांनी महिलेला अडवले. दिवाळी भेट देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. महिलेला बोलण्यात गुंतवून चाेरट्यांनी पिशवीतून ९२ हजार रुपयांचे मंगळसूूत्र चोरले. पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करत आहेत.