राज्य सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सवापूर्वी?, किती जणांना मिळणार मंत्रिपद?, अजितदादा गटाचा काय दावा?

पहिला राज्य मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजपाच्या व शिंदे गटाच्या वाट्याला प्रत्येकी १०-१० मंत्रीपद आली आहेत. यानंतर अजितदादा गटाला ९ मंत्रिपद मिळाली आहेत. त्यामुळं अजून जी १४ मंत्रीपद बाकी आहेत, त्यातून अजितदादा गटाला एक मंत्रिपद मिळू शकते. तर भाजपाला १४ मधून सर्वाधिक मंत्रीपदं मिळू शकतात.

  मुंबई – राज्यात मागील वर्षी शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडली. शिंदे गटाने (Shinde Group) मोठे बंड केल्यानंतर भाजपासोबत सरकार स्थापन केले. यावेळी १ ऑगस्ट २०२२ रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी भाजपा व शिंदे गटातील ९-९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील नेते आस लावून बसले होते. भाजपा व शिंदे गटातील नेते दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार होईल, आणि आपणाला मंत्रिपद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्या सर्वाचा भ्रमनिराश झाला. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार गटाने मोठे बंड केले. आणि राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी अजितदादा गटातील ९ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्रीपद आहेत, त्यामुळं अजून १४ मंत्रीपद रिक्त आहेत. (the third cabinet expansion of the state government before ganeshotsav what is said ajitdada group read more)

  अजूनपर्यंत कोणाला किती मंत्रीपद…

  दरम्यान, पहिला राज्य मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजपाच्या व शिंदे गटाच्या वाट्याला प्रत्येकी १०-१० मंत्रीपद आली आहेत. यानंतर अजितदादा गटाला ९ मंत्रिपद मिळाली आहेत. त्यामुळं अजून जी १४ मंत्रीपद बाकी आहेत, त्यातून अजितदादा गटाला एक मंत्रिपद मिळू शकते. तर भाजपाला १४ मधून सर्वाधिक मंत्रीपदं मिळू शकतात. कारण १०५ आमदार व १० अपक्षांचा पाठिंबा भाजपाला आहे. त्यामुळं भाजपा जास्त मंत्रिपद पारड्यात पाडून घेऊ शकते.

  गणेशोत्सवापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार?

  मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवापूर्वीच राज्य मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जातंय. याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणी सुरु असून, प्रमुख नेते दिल्लीत अमित शहा व पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. एकूण ४३ जणांचे जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे. परंतू शिंदे गटातील संजय शिरसाट, भरत गोगावले असे अनेक नेते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत, त्यातून कोणाची वर्णी लागणार आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे थोड्याच दिवसात समजणार आहे.

  अजितदादा गटाचा दावा काय?

  राज्य मंत्रीमंडळ विस्तारावरुन तीन पक्षाच्य हालचाली सुरु असताना, आणि यांना वेग आला असताना, अजितदादा गटाने एक मोठा दावा केला आहे. आमच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळेल, असा विश्वास अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराआधीच तटकरेंनी मोठे वक्तव्य केल्यामुलं सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.