The three accused in the old feud have been remanded in custody till June 26, while the juvenile accused will be remanded in custody

२२ जून रोजी सांयकाळी ७ वाजता आरोपींनी फिर्यादीचा पती जावेद महेबुब खा पठाण यांना चाकू व फरशीने मारहाण करून जिवाने ठार केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात तीन आरोपी व एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली असून, तीन आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

    वर्धा : जुन्या वादाच्या कारणातून इसमाची चाकू भोसकून व फरशीने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची घटना २२ जून रोजी सांयकाळी ७ वाजताच्या दरम्यान, शहरातील आनंदनगर भागात घडली. खूनातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तीन आरोपींना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर विधीसंघर्षित बालकाला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

    याबाबत फिर्यादी सफीया जावेद खान पठाण (रा. आनंदनगर, वर्धा) यांनी २२ जून रोजी वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात त्यांचे पती जावेद महेबुब खा पठाण (वय ४०) वयांचा त्यांच्या शेजारी राहणारे लियाकत अली, रुबिना लियाकत अली, सोनु नावाचा लियाकतचा भाचा व एक विधीसंघर्षित बालक या चार जणांनी मिळून जुन्या वादाच्या कारणातून वाद केला. २२ जून रोजी सांयकाळी ७ वाजता आरोपींनी फिर्यादीचा पती जावेद महेबुब खा पठाण यांना चाकू व फरशीने मारहाण करून जिवाने ठार केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात तीन आरोपी व एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली असून, तीन आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

    सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस  अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी हे करीत आहेत.