
घराच्या पेटींग व साफसफाईचे काम दिलेल्या तरुणानेच साथीदारांच्या मदतीने जेवण मागत घरात घुसून एका ज्येष्ठ महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देत लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या अंगावरील दागिने, रोकड व मोबाईल असा ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली असून, याघटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
पुणे : घराच्या पेटींग व साफसफाईचे काम दिलेल्या तरुणानेच साथीदारांच्या मदतीने जेवण मागत घरात घुसून एका ज्येष्ठ महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देत लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या अंगावरील दागिने, रोकड व मोबाईल असा ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली असून, याघटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून १८ वर्षीय तरुणासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. तक्रारदार महिला एकटी राहते. त्यांच्या घराचे काम त्यांनी संबंधित तरुणाला दिले होते. त्याने पेटींगचे काम केले व साफसफाईचे काम उद्या करतो म्हणून निघून गेला. पण, तो परत आला नाही. त्यानंतर तो मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला. त्याने आई गावाला गेली आहे. थोडे जेवण देता का असे म्हणत घरात प्रवेश केला. महिला जेवण आणण्यास आत जाताच त्याचे दोन साथीदार घरात शिरले. या तिघांनी महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देत लुटले. पुढील तपास पोलीस करत आहेत.