राहूड घाटात ‘बर्निंग बस’चा थरार, सुदैवाने जीवितहानी नाही

बस दुपारी १२ वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील राहूड घाटात आल्यावर बसच्या इंजिन मधून दूर बाहेर निघू लागला. हे बस चालक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बस घाटातील मुंबई आग्रा महामार्गाच्या कडेला उभी केली. त्यांनी त्वरित बसमधील सर्व प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले.

    चांदवड, (वा.) मुंबई आग्रा महामार्गावरील राहूड (ता.चांदवड) घाटात चालत्या बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील चालक, कंडक्टरसह सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने जीवितहानी टळली.

    शहादा येथील परिवहन महामंडळाची बस (क्र. एम. एच. २०, बी. एल. ४१२८) बुधवार (दि.१८) रोजी सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने ३० ते ३५ प्रवाश्यांना घेऊन निघाली होती. बस दुपारी १२ वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील राहूड घाटात आल्यावर बसच्या इंजिन मधून दूर बाहेर निघू लागला. हे बस चालक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बस घाटातील मुंबई आग्रा महामार्गाच्या कडेला उभी केली. त्यांनी त्वरित बसमधील सर्व प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले. यावेळी आगीने बसला पूर्णतः वेढा घेतल्याने आगीचे लोणचे लोण हवेत वरवर जात होते. यामुळे मालेगावकडून येणारी वाहतूक काही वेळ एकेरी करण्यात आली होती.

    बसला आग लागल्याचे समजताच मंगरूळ येथील सोमा टोलवेज कंपनीच्या अपघात विभाग व अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून बसला लागलेली आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. बसला आग लागल्याचे समजताच राहूड पंचक्रोशीतील नागरिक प्रवाश्यांच्या मदतीसाठी धावून आले होते.