पुण्यात PMPML बसचा थरार ! बसचालकाने येईल त्या वाहनांना उडवलं अन्…; व्हिडिओ होतोय व्हायरल

पुण्यात पीएमपीएमएल बस चालकानं वाहनांना उडवलं आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे. या पीएमपीएमएल बस चालकाच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुषवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : पुण्यात पीएमपीएमएल बस चालकानं वाहनांना उडवलं आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे. या पीएमपीएमएल बस चालकाच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुषवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

    पीएमपीएमएल चालकाचा काही गाडी चालकासोबत वाद झाला होता. त्यावेळी त्याने बस आधी समोर घेतली मात्र त्यानंतर त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट बस रिव्हर्स घेतली. हे पाहून पुण्यातील सेनापती बापट रोडवरील लोकांनी आरडा ओरड सुरु केली. मात्र या सगळ्याला न जुमानता बस चालकाने थेट बस मागे घेत अनेक गाड्यांना उडवलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सावंत हा पीएमपीएमएल बस चालक आहे. तो शनिवारी पीएमपीएमएलची बस क्रमांक एमएच १४, एचयु ५७२५ हे घेऊन पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होता.