The tiger was hunted by giving an electric shock! The hunters cut the tiger's body into 14 pieces

११ ऑगस्टच्या रात्री उशिरा वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. शिकारींनी वाघाच्या शरीराचे १४ तुकडे (14 pieces of tiger body) केले होते. आरोपीने जबडा, तोंड आणि नखे यांचा भाग काढून घेतला होता. वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील महालगाव येथील अविनाश भारत सोयाम (३४) याला ताब्यात घेतले.

    वर्धा : समुद्रपूर वनपरिक्षेत्र (Samudrapur Forest Zone) अंतर्गत येणाऱ्या पवनगाव झुडपी वने परिसरात वाघाच्या मृतदेहाचे १४ तुकडे सापडले होते. या प्रकरणी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील महालगाव (Mahalgaon in Chandrapur district) येथून एका आरोपीला अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातच विजेच्या तारेने वाघाची शिकार (Tiger hunting with electric wire) करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाघाचा मृतदेह छिन्नविछिन्न करून पवनगाव झुडपी वन परिसरात फेकला होते. आरोपीला ३ दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे.

    ११ ऑगस्टच्या रात्री उशिरा वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. शिकारींनी वाघाच्या शरीराचे १४ तुकडे (14 pieces of tiger body) केले होते. आरोपीने जबडा, तोंड आणि नखे यांचा भाग काढून घेतला होता. रविवारी दिवसभर सहा. वनसंरक्षक अमरजित पवार तपासात गुंतले होते. वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील महालगाव येथील अविनाश भारत सोयाम (३४) याला वनविभागाने ताब्यात घेतले. सोयाम याने त्याच्या साथीदारासोबत ही घटना केली असल्याची माहिती आहे.

    आरोपीला वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये (Wildlife Protection Act) न्यायालयात हजर केले केल्यानंतर ३ दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई  वनसंरक्षक राकेश सेप्ट यांच्या मार्गदर्शनात वनसंरक्षक अमरजीत पवार, चंद्रपूर वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गोरुडे, नागपूर शिकार नियंत्रणाचे आरएफओ आशिष निनावे, समुद्रपूरच्या वन परिक्षेत्र अधिकारी वैशाली भरेकर यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

    उल्लेखनीय म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यात शिकारींनी विजेच्या तारेला करंट देऊन वाघाची शिकार केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे झाले. त्यातील काही भाग सोबत नेले तर उर्वरित तुकडे वर्धा जिल्ह्यातील पवनगाव झुडपी वनपरिक्षेत्रात फेकून दिले. लवकरच अन्य आरोपीही ताब्यात घेतले जातील, अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.