शिंदे गटाचा संपण्याचा काळ आला,अंबादास दानवेंचा हल्लाबोल

शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने आज परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीया येत असून भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती दिवस रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील.

    मुंबई – शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, आमचा न्यायदेवतेवरील विश्वासाची दृढता वाढवणारा आजचा निकाल आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील. शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालाबाबत मी मत व्यक्त करणार नाही.

    शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने आज परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीया येत असून भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती दिवस रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील. शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला तर काड्या करणाऱ्या बंडखोरांना चपराक मिळाली असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेना १९६६ पासून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत आहे. तिथेच मेळावा घेण्याबाबत ठरले. त्याबाबत सतत बैठका होत राहील्या. दसरा मेळावा होऊ नये म्हणून काड्या करण्याचे काम केले जात आहे. जे बंड करणारे लोक आहेत त्यांना मी म्हणेल की, आता बस झाले. त्यांना न्यायालयाने चपराक दिला. मी न्यायपालिकेला धन्यवाद देईल.