धावत्या कंटेनरचा टायर फुटून कंटेनरला आग ; कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

धावत्या कंटेनरचा टायर फुटून लागलेल्या आगीत कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक पुण्याहुन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटल्याने चालक कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्सची राख झाली.

    पुणे : या ठिकाणी धावत्या कंटेनरचा टायर फुटून लागलेल्या आगीत कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक पुण्याहुन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटल्याने चालक कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्सची राख झाली.

    आळेफाटा येथील बायपास जवळ सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चाकण एमआयडिसी मधील ऑटो स्पेयर पार्ट्स कंपनीतून पार्ट भरून (एन.एल.१ ए.एच.१४४३ ) या क्रमाकांचा कंटेनर पुणे-नाशिक महामार्गाने नाशिककडे जात असताना आळेफाटा बायपासला अचानक या धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने चालकाने गाडी बाजुला घेण्याचा प्रयत्न करत असताना कंटेनरने अचानक पणे पेट घेतल्यामुळे चालक व वाहक यांनी बाहेर उड्या मारल्याने ते दोघेही सुखरूप बचावले, मात्र मागील बाजूच्या टायरने आगीचा भडका घेतल्याने कंटेनर मध्ये असलेले लाखो रुपयांचे ऑटो स्पेअर पार्ट जळुन खाक झाले आहे सुदैवाने या ठिकाणी झालेल्या घटनेत जिवीतहानी झाली नाही.

    घटनास्थळी घटना घडल्यानंतर तीन तासानंतर अग्नीशामक दलाची गाडी आल्यानंतर वडगाव आनंद गावचे उपसरपंच ऋषिकेश गडगे, स्वप्नील देवकर, दीपक शिंदे, साहिल गडगे, शुभम गडगे यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आळेफाटा हे पुणे- नाशिक व नगर -कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गांला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असुन या ठिकाणी वहानांची मोठ्या दररोज प्रमाणावर खरेदी विक्री होत असते.