टोलमाफीसाठी वाहनांची वर्दळ पण अपघाताचा भरतोय बाजार!

सध्या वाहतुकीची समस्या बिकट झाली असून राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन टोलनाके कार्यान्वित केलेले आहेत त्यामुळे आठ मार्गाने असणाऱ्या रस्त्यावर टोल माफीसाठी वाहनांची वर्दळ झालेली आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील आंबवडे चौकात बाजारच्या दिवशीसुद्धा अपघाताचा बाजार भरत असल्याचे चित्र उघड्या डोळ्याने पहावे लागत आहे.

  कोरेगाव: सध्या वाहतुकीची समस्या बिकट झाली असून राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन टोलनाके कार्यान्वित केलेले आहेत त्यामुळे आठ मार्गाने असणाऱ्या रस्त्यावर टोल माफीसाठी वाहनांची वर्दळ झालेली आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील आंबवडे चौकात बाजारच्या दिवशीसुद्धा अपघाताचा बाजार भरत असल्याचे चित्र उघड्या डोळ्याने पहावे लागत आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी आंदोलनाचा इशारा देऊन हा बाजार इतर ठिकाणी भरवावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

  माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हद्दीमधून वाठार स्टेशन परिसरातील अंबवडे गाव सध्या अपघातामुळे चांगलेच चर्चेत आलेले आहे. सातारा-लोणंद( नॅशनल हायवे क्रमांक ६१ ) रस्त्यावरील अंबवडे चौक येथील दर गुरुवारचा आठवडा बाजराची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी घेण्यात येण्याबाबत सातत्याने तोंडी व लेखी मागणी केली जात होती. कारण या ठिकाणी बाजारच्या दिवशीसुद्धा अनेक वाहनांची इजा होत आहे. विशेषतः टोल माफी व्हावी, यासाठी जड वाहने याच रस्त्यावरून मार्गक्रमण करीत आहेत. बाजारच्या दिवशी मोठी गर्दी होत असून रस्त्यालगतच बाजार भरत असल्याने भविष्यात मोठा अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग येणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून या विरोधात दि.७ डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी रस्ता रोको करणार असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी निवेदन दिलेले आहे.

  काल या ठिकाणी झालेल्या ट्रक व टाटा सुमो अपघात आठवडा बाजारात फरसाण विक्री करणाऱ्या गरीब कष्टकरी आई व मुलगा यांचा अपघात झाला. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथील रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत. सदर महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. डोक्यातील छोट्या मेंदूला मार लागला असून प्रकृती गंभीर आहे. सातारा लोणंद रस्ता रहदारीचा असून जास्त प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. दिवस रात्र वाहनांची वर्दळ चालू असते. असे असताना देखील माणसांचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी आठवडा बाजार भरतोय. काल झालेला अपघातात जबाबदार कोण? यात मनुष्याची जीवितहानी झाली.

  तर यासाठी जबाबदार कोण ? वाठार पोलीस स्टेशन हद्दीत हा बाजार भरत असून, हा बाजार भरवण्यासाठी परवानगी कोणी दिली? कोणतीही ठोस उपाययोजना नसतान, वाहतुकीबद्दलचे नियम पाहत असता रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाजार भरवणे कितपत योग्य आहे ? असा मूलभूत प्रश्न स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांनी विचारलेला आहे.

  काल झालेल्या अपघातात वाठार पोलीस स्टेशनचे महामार्गावर वाहतूक बघणारे संबंधित पोलीस यंत्रणा जबाबदार आहेत का ? याआधीही या ठिकाणी अपघात झालेले असताना देखील त्यांनी कानाडोळा केला होता का? काल झालेल्या अपघातातील कष्टकरी कुटुंबास व इथून पुढे होणाऱ्या जखमी व मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीस कुटुंबास मदत कोण करणार? हे ही जाहीर करावे. अशी ही मागणी करण्यात आलेली आहे. पूर्वी वाहनांना अडथळा होऊ नये तसेच बाजारहाट करताना कोणालाही वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून जुना बाजार पळशी रस्त्याला भरत होता. त्याच रस्त्यावर बाजार सुरू करावा.

  या मागणीसाठी गुरुवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अंबवडे चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने तसेच वाहनचालकांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नैतिक जबाबदारी घेऊन तत्पूर्वी संबंधित विभागाने सूचना करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.