बोरघाटात ट्रेलर टेम्पोला धडकला; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पोला ट्रेलरने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही गाड्या महामार्गावर पलटी झाल्या असून या अपघातात जीवितहानी झाली का, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलीस करत आहेत.

    पिंपरी चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express way) वाहतूक कोंडी झालेली आहे. टेम्पोला ट्रेलरने धडक दिल्याने अपघात झाला असून या भीषण अपघातानंतर (Accident) एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. बोरघाटातील ट्राफिक पोलीस चौकीजवळ ट्रेलर उलटला आहे.

    यात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा अनेकांना फटका बसला आहे. या भीषण अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून टेम्पो आणि ट्रेलर यांच्या धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामुळे टेम्पो उलटला असून ट्रेलरचे नुकसान झाले आहे.

    या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी (Traffic jam) झाली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. ट्रेलरने टेम्पोला धडक दिली होती. त्यात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर

    अपघातानंतर दोन्ही गाड्या महामार्गावर पलटी झाल्या. दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली का, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना लोणावळ्याजवळ १००० मीटर लांबीच्या मार्गावर लेन जोडण्याचे काम सुरू आहे.

    हे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेले बांधकाम हा महामार्गावरील राज्य सरकारच्या ‘मिसिंग लिंक प्रोजेक्ट’चा भाग आहे. या कामामुळेही अपघात होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून जास्त होत असल्याचे दिसून आले आहे.

    चार दिवसांपूर्वीच झाला होता भीषण अपघात

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गॅस टँकर विरूद्ध बाजूला कारला धडकला. त्यात या कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. खोपोली एक्झिटजवळ या अपघाताची घटना घडली होती. टँकर पुणे लेनवरून मुंबई लेनमध्ये जाऊन एका कारला ठोकरला होता. याशिवाय अपघात होण्याचे सरासरी प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढल्याचे दिसत आहे.