Bacchu Kadu

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यांना नोटीस बजावणार आहे, आरोप सिद्ध न झाल्यास वेगळा निर्णय घेणार आहे. किंवा मी राजीनामा द्याला तयार आहे, माझ्यासोबत सात ते आठ आमदार आहेत. असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तसेच १ नोव्हेंबरला ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दिसेल, असा इशारा बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीसांना सरकारला दिला आहे.

    अमरावती: बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि अचलपूरचे अपक्ष आमदार व माजी मंत्री बच्चू कडू (Bachu kadu) यांच्यात सध्या पन्नास खोके…व मोफत किराणा वाटपावरून वाद सुरू आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे, चक्क बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. यावर संतापलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारलाच (Shinde fadnavis government) आव्हान देत अल्टीमेटम दिला आहे. तसेच राणांच्या आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

    दरम्यान, रवी राणांच्या आरोपाची ईडीकडून चौकशी व्हावी असं मला वाटतं. माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळं घाबरणार नाही. ईडीच्या चौकशीला मी सामोरी जाण्यास तयार आहे. या प्रकरणी शिंदे-फडणवीस यांनी मध्यस्थी करायला हवी, रवी राणांच्या आरोपात शिंदे-फडणवीस हे आरोपी आहेत. सततच्या खोट्या आरोपामुळं मी आवाज उठवला, प्रसिद्धी मिळवण्यासाठी राणा खोटे आरोप करताहेत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यांना नोटीस बजावणार आहे, आरोप सिद्ध न झाल्यास वेगळा निर्णय घेणार आहे. किंवा मी राजीनामा द्याला तयार आहे, माझ्यासोबत सात ते आठ आमदार आहेत. असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तसेच १ नोव्हेंबरला ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दिसेल, असा इशारा बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीसांना सरकारला दिला आहे.