Uddhav Thackeray's warning

आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं.

    हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, गद्दाराला नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा पार पडली. या सभेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.

    उद्धव ठाकरे म्हणाले, “काहीजणांना अपेक्षा असेल, की मी गद्दारांवर बोलेल. पण, गद्दारांवर माझा वेळ घालवणार नाही. गद्दारांचा समाचार घेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. मी हिंगोलीत तुमच्यासाठी आलोय, गद्दांरासाठी नाही. गद्दार अनेक झालेत, मात्र हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचार आणि भगव्याच्या मागे उभी राहिली आहे.”

    काय म्हणाले उद्धव ठाकरे?
    “आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं.