भारतमाता की जय च्या जयघोषात निघाली तिरंगा पदयात्रा

भारतीय जनता पार्टी शहर मध्य च्या वतीने शनिवारी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. सजवलेल्या बग्गीमध्ये भारतमातेची वेशभूषा कु. कोमल चिप्पा याने साकारली होती. तसेच तिरंगा ध्वज घेतलेले शेकडो नागरिक आणि भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    सोलापूर : भारतीय जनता पार्टी शहर मध्य च्या वतीने शनिवारी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. सजवलेल्या बग्गीमध्ये भारतमातेची वेशभूषा कु. कोमल चिप्पा याने साकारली होती. तसेच तिरंगा ध्वज घेतलेले शेकडो नागरिक आणि भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती. माजी नगरसेवक सुनिल कामाठी यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते.

    यावेळी नागरिकांनी छत्रपति श्री शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, चार हुतात्मे आदी महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन सहभाग नोंदवला.

    याप्रसंगी शहर संघटक सरचिटणीस रूद्रेश बोरामणी, नगरसेविका जुगनूबाई आंबेवाले, विजया वड्डेपल्ली, जय साळुंखे,अनिल कंदलगी, भूपती कमटम, मल्लिकार्जुन सरगम, अशोक यनगंटी,गोपीकृष्ण वड्डेपल्ली,सुनिल पाताळे,समशेर आंबे वाले,भीमा असादे,दत्तात्रय पोस्सा, भिमाशंकर बिराजदार,रंगनाथ पवार,मल्लिकार्जुन पाटील, अनिल कामाठी,जावेद पटेल, स्टेफन स्वामी, अबिद घडीवाले, रुस्तुम शेख, मेहबूब नाईकवाडी, महेश खाणोरे, चन्नवीर बिराजदार, वैभव परदेशी, रवि गोणे, रवि कोठमाळे, पिंटू गायकवाड, अंबादास माढेकर, आकाश मुदगल, हेमंत विटकर, पवन पुल्ली, सोनू नागणसुरे, प्रकाश असादे, विशाल गुजले, अमोल भोसले आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.