कोरड्या विहिरीच्या खडकावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; बीडच्या उमरी गावातील घटना

बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी येथील, एका शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीतील खडकावर पडून जागीच मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर सखाराम घायतिडक (वय 55) असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

    बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी येथील, एका शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीतील खडकावर पडून जागीच मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर सखाराम घायतिडक (वय 55) असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

    मयत शेतकरी सिद्धेश्वर धायतिडक हे त्यांच्या स्वतःच्या शेतातील आखाड्यावर जनावरे राखण्यासाठी मुक्कामी थांबले होते. रात्री झोपेतून उठले आसता त्यांना विहीराचा अंदाज न आल्याने कोरड्या विहिरीत खडकावर पडल्याने त्यांचा डोक्याला व नाकाला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान आपले वडील कसे घरी आले नाहीत हे पाहण्यासाठी मुलगा शेतात गेला आसता, ही घटना निदर्शनास आली. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुली, एक मुलगा, भाऊ आसा मोठा परिवार असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.