आमदार अपात्रतेप्रकरणी उद्या येणार निकाल; नार्वेकरांनी मसुदा पाठविला दिल्लीतील तज्ज्ञांकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रताप्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला असून, 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागण्याची शक्यता आहे.

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रताप्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला असून, 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे समजते.

  न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणे अनिवार्य होते. विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाईल. शिवसेनेतल्या आमदार अपात्रतेवर चार महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे.

  न्याय मिळेल कसा?

  गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो. आरोपीसोबत चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो. देशाची न्यायव्यवस्था बिकट झाली आहे. न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळणार?

  – संजय राऊत, खासदार, शिवसेना.

  २ फेब्रुवारीला सुनावणी

  शिवसेना कोणाची याचा फैसलाही फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले होते. मात्र, तेव्हा 2 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.