अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, अजित पवारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

अतिवृष्टीनं झालेलं शेतजमीन व पिकांचं नुकसान लक्षात घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे आदी मागण्यांचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिले.

    मुंबई : राज्यात यावर्षी मुसळधार पावसामुळं (State Rain) शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  विदर्भ, मराठवाड्यासह (Vidharbha and Marathawada) राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (flood) आणि पुरामुळे (due to flooding) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार, फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी. अतिवृष्टीनं झालेलं शेतजमीन व पिकांचं नुकसान लक्षात घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे आदी मागण्यांचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिले.

    दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांचा दौरा करुन स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीची तसेच आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली. त्यासंदर्भातील सविस्तर निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पुरस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देतानाच आवश्यक उपाययोजनाही सुचवल्या आहेत.